अमरावती : भंगार विक्रीतून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल झाला आहे. भंगाराची विल्हेवाट लावण्याकरिता मध्य रेल्वेमार्फत शून्य भंगार मोहिम राबवण्यात येते. या मोहिमेंतर्गत जुलै २०२३ मध्ये ३४७.६७ मेट्रिक टन भंगाराची विक्री करण्यात आली असून, १.६३ कोटींचा महसूल जमा झाला. एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीत एकूण १७४३.६७ मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली असून त्यातून ९.६७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांच्या परिसरातील भंगाराची विक्री करून महसूल मिळवला आहे. कार्यशाळा, आगारे, कारखाने, रेल्वे परिसरातील निरुपयोगी रूळ, मोडीत काढलेले डबे, वाघिणी, इंजिने, रुळाचे साहित्य, चाके, पोलादी खांब व इतर धातूच्या वस्तूंची विक्री करण्यात आली आहे. रेल्वेच्या कार्यशाळा आणि शेडमधील भंगार विकण्यात येते. या मोहिमेमुळे भंगाराने अडवून ठेवलेली जागा स्वच्छ होत आहे.

हेही वाचा >>> Weather Update: आनंदवार्ता! पावसाच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भंगार विक्रीत लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात आली आहे. भुसावळ विभागाने देखरेखीद्वारे इंधन अर्थव्यवस्था उपाय म्हणून सुमारे १.९० कोटी रुपयांची बचत देखील नोंदवली आहे, ज्यामुळे जुलै २०२३ दरम्यान ८१० डिझेल लोको निष्क्रिय वेळेत बंद करणे शक्य झाले. भुसावळ विभागाच्या इतर कामगिरीमध्ये शेगाव-नागझरी विभागावरील लेव्हल क्रॉसिंग गेट (एलसी) गेट क्र. २९ च्या जागी २ रोड अंडर ब्रिज (रोड अंडर ब्रिज) आणि नागझरीवरील लेव्हल क्रॉसिंग गेट (एलसी) गेट क्रमांक ३१ चे काम -पारस विभाग सुरू आहे.