लोकसत्ता टीम

नागपूर : कर्मयोगी फाऊंडेशन ग्रामीण भागात उत्तम कार्य करीत असून गरजूंच्या कामी पडत आहे. आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी लासेनारदेखील सहकार्य करेल, असे प्रतिपादन लासेनार इंडिया प्रा. लि. बुटीबोरीचे संचालक सचिन चौधरी केले.

लासेनार इंडिया प्रा. लि. बुटीबोरी यांच्या सौजन्याने संविधानदिनी आई सभागृह, बुटीबोरी येथे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या २५ मुलींना सायकली वितरित करण्यात आल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे सभापती अहमदबाबू शेख, प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सचिन पावडे, दिनकर कडू, डॉ. प्रशांत कडू, मनोहर पोटे, महेंदसिंह चौहान ही मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. कर्मयोगी फाऊंडेशनने आई -वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढवण्यासाठी व त्यांनाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी २०२३ मध्ये १२५ सायकल वाटपाचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा २५ सायकल वाटपाचा चौथा टप्पा स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना उजाळा देत व संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित केला.

आणखी वाचा-गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण अन तीन हजार किलोची खिचडी; काय आहे वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लासेनार कंपनी येणाऱ्या दिवसात कर्मयोगीला सोबत घेऊन या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावेल. आमच्याकडे ९५ टक्के कामगार या भागातील स्थानिक लोक आहेत. कोणालाही काही अडचण असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन सचिन चौधरी यांनी केले.