लोकसत्ता टीम

नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तीन हजार किलोची खिचडी तयार केली आहे

bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
thieves stole jewellery from different parts of pune during diwali
लक्ष्मीपूजनाला सदनिकेतून दागिने लंपास- वारजे, लोणी काळभोर भागातील घटना
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु आहे. या खासदार महोत्सवात विविध कार्यक्रम होत असताना गुरुवारी विजय गजानन स्तोत्राचे पठण केले जात आहे. पठण करणाऱ्या भाविकांना या प्रसादाचे वितरण केले जाणार आहे. पहाटेपासूनच या खिचडीच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या खिचडी प्रसादाचा वाटपाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा-राज्यात गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के

या खिचडीसाठी तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंब‍िर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्‍याचा वापर केला. त्‍यासाठी १० फूट व्‍यासाची, ५ फूट ऊचीची कढईचा उपयोग करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार गजानन महाराजांचे भक्त या महाप्रसादाचा लाभ घेणार आहे.