नागपूर: मुख्यमंत्री म्हणून ‘मी पुन्हा येणार’ असा निर्धार करणा-या फडणवीस यांना या पदापासून दूर ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षात फूट पाडण्यात यशस्वी ठरलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे पक्ष कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्रातील महाचाणक्य ठरले आहेत. तसे फलक त्यांनी लावले आहेत.

बुटीबोरी नगर पंचायतीचे अध्यक्ष व भाजप नेते बबलू गौतम यांनी हा फलक लावले आहेत. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एक वर्षात दोन पक्षात मोठी फूट घडवून आणली व त्यांना भाजपसोबत आणले. त्यामुळेच ते चाणक्य ठरतात, असे फलकावर नमुद केले आहे. यापूर्वी गौतम यांनी फडणवीस यांचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले होते. मात्र खुद्द फडणवीस यांनी ते काढायला लावले होते.