महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना या सीमा वादाला पंडित नेहरुच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा सीमा प्रश्न पंडित नेहरुंमुळे उद्भवला असून त्यांनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे, असे ते म्हणाले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…यावरून ‘मला तळमळतंय्, मला जळजळतंय्’, अशी तुमची अवस्था होणे साहजिक” ; भाजपाचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर!

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“पंडित नेहरुंनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे. त्यांनी राज्य पुर्नरचना आयोगाच्या माध्यमातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरते आहे. अनेक वर्षंपासून हा संघर्ष असाच सुरू आहे. हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ४० गावांच्या संदर्भात दोन्ही राज्य सकारात्मक असतील. तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय दोन्हीही राज्यांचे म्हणणे ऐकूण योग्य तो निर्णय देतील”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.

हेही वाचा – दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“कर्नाटकमधील मराठी जनतेला महाराष्ट्रात यावं असं वाटणं, स्वाभाविक आहे. मी जेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटलो तेव्हा त्यांची महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा मला जाणवली होती. त्यांना आजही वाटतं की आपण महाराष्ट्रात जावं, मात्र, त्यांना नेहरुंच्या चुकीचे परिणाम भोगावे लागत आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अहवाल सादर केल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “Master of all…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जत गावातील ग्रामपंचायती कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छूक असेल, तरीही हा प्रश्न सुटणार नाही. मग कर्नाटकमध्ये जी गावं आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे, त्यांच काय होणार? मुळात या ४० गावांना महाराष्ट्र सरकारने एवढी मदत आजपर्यंत कोणीही केली नाही. मदत करण्यात जेवढा महाराष्ट्र पुढे आहे, तेवढं देशातील कोणतेही राज्य नाही, त्यामुळे सरकारने मदत केली नाही, म्हणून जर ही गावं कर्नाटकात जायचा ठराव करत असेल, तर ही आश्चर्याची गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.