नागपूर: माजी मंत्री व भाजप आमदार बबनराव पाचपुते यांची गुरुवारी अचानक प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांना विधान भवनातून रुग्णालयात हलवले.बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. सहकाऱ्यांनी त्यांना परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.

पाचपुते यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे बघत तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला गेला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णवाहिका फसली

बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधान भवनाच्या मागच्या द्वारातून आत येत असताना रुग्णवाहिकेचे एक मलवाहिनीच्या चेंबरमध्ये मागचे चाक फसले. लोकांनी धक्का मारून तिला बाहेर काढले.