भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचा सहसंयोजक व प्रदेश उपाध्यक्ष रोहित माडेवारला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्यावर नागपुरातील एका जाहिरात कंपनीच्या मालकाला साडे चार कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४६ लाखांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >>> उद्योजक घडविण्यासाठी ‘बार्टी’चे पाऊल ; शासकीय योजनांचे लवकरच ‘बेंच मार्क सर्वेक्षण’

यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात बजाजनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून माडेवार पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. रोहित माडेवार (रा. मेघदूत सोसायटी, हुडकेश्वर) असे आरोपी महाठगाचे नाव आहे. रोहित माडेवारने गरीबांना, भुकेलेल्यांसाठी ‘रोटी फाऊंडेशन’ काढली असून त्या माध्यमातून तो समाजसेवा करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरी येथे राहणारे दिनेश मारसेट्टीवार असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची जाहिरात एजंसी आहे. त्यांना राहण्यासह ऑफीसासाठी फ्लॅटची आवश्यकता होती. यासाठी त्यांना गृहकर्ज हवे होते.

हेही वाचा >>> खळबळजनक! बनावटी कागदपत्राद्वारे परिचर्या महाविद्यालयाला मंजुरी!

जुलै २०२० मध्ये श्रीराम तेंडुलकर नावाच्या ‘सीए’ने त्यांची माडेवारसोबत ओळख करुन दिली. यावेळी माडेवारने स्वत:ला राष्ट्रीय बँकेचा रिकव्हरी एजंट असल्याचे सांगितले. आपली बँकेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून ४ कोटी ५० लाखाचे गृह कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवले. मारसेट्टीवार यांच्याकडून स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्चासाठी १४ लाख रुपये घेतले. यानंतर त्याने ४.५० कोटीचे गृह कर्ज मंजूर झाल्याचा मूळ डिडी देण्याऐवजी झेरॉक्स स्वरूपात दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माडेवारवर विश्वास ठेवून मारसेट्टीवार यांनी तीन फ्लॅटची रजिस्ट्री केली. याकरिता त्यांना ३२ लाखाची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली. ४.५० कोटींचे गृहकर्ज मंजूर झाल्याचे डिडीची झेरॉक्स प्रत दाखवली असता ४६ लाखांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सात महिन्यानंतर माडेवारला पोलिसांनी अटक केली.