नागपूर: महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्षांवर शासनाने आकसापोटी बदलीची कारवाई केल्याचा आरोप करत नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी रुग्णालयातील अनेक परिचारिका सलग तिसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून सेवा देत आहेत. शासनाने तातडीने मागणी मान्य न केल्यास २९ नोव्हेंबरपासून संघटनेने कामबंदचा इशारा दिला आहे. तर प्रशासनानेही रुग्णसेवा प्रभावीत होऊ नये म्हणून उपाय सुरू केले आहे.

दरम्यान तिसऱ्या दिवशी सोमवारी मेडिकल व सुपरस्पेशालीटी परिसरात परिचारिकांनी काही काळ गोळा होऊन शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शहजाद बाबा खान म्हणाले, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरकडून वेळोवेळी परिचारिकांच्या मागणीसाठी आंदोलन केले जाते. संघटनेने सोलापूरसह इतर संस्थेतील अधिसेविकेच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार देत आंदोलनाचा इशाराही दिला. त्यावर कारवाई झाली नाही. उलट संघटनेच्या राज्याध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते.

हेही वाचा >>> बदल्यांवरून राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खदखद, कारणे कोणती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा अन्याय असून तो संघटनेकडून सहन केला जाणार नाही. संघटनेने मेडिकल, मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस देत शनिवारपासून काळ्या फिती लावून सेवा सुरू केली आहे. परंतु शासनाकडून संघटनेला हवा तसा प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे २९ नोव्हेंबरपासून संघटनेकडून कामबंदची तयारी सुरू आहे. दरम्यान एक प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यावर निर्णय संध्याकाळपर्यंत निश्चित होणार असून त्यानंतर कामबंदबाबत स्पष्टता येईल. तर मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी रुग्णालय प्रशासनाकडून परिचारिकांच्या कामबंदने रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून विविध बैठकी घेत नियोजन सुरू करण्यात आले आहे.