गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भाग कायम नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे धुमसत असतो. त्यात भामरागड तर अतीसंवेदनशील असा तालुका. याच तालुक्यातील नक्षलग्रस्त अशा लष्कर गावातील प्रिन्स आरकी हा चिमुकला सध्या चर्चेत आहे, तो शिक्षणासाठीच्या संघर्षासाठी.

राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या झळा राज्याच्या शेवटच्या टोकावर वास्तव्यास असलेल्या चिमुकल्या ‘प्रिन्स’ला सोसाव्या लागत आहे.

हेही वाचा >>> ‘हे’ सरकार हिंदूंना बरबाद करणारे; नाना पटोले म्हणाले कसबा पेठ, चिंचवडची पोटनिवडणुक…   

पटसंख्या कमी असल्याने भामरागड तालुक्यातील बऱ्याच शाळांचे इतरत्र समायोजन करण्यात आले. त्यामुळे प्रिन्स रहिवासी असलेल्या लष्कर या गावातील शाळा बंद पडली. त्यामुळे अनेकांची शाळा सुटली, तर काहींनी इतरत्र प्रवेश घेतला.

प्रिन्सचे आई वडील दोघेही शिक्षित असल्याने मुलाच्या शिक्षणाबद्दल ते जागरूक आहे. त्यामुळे लष्करपासून ३ किलोमिटर असलेल्या होड्री येथे प्रिन्सने प्रवेश घेतला. पण भामरागड तालुक्यात आजही शेकडो गावांना जोडणारे रस्ते नाही. त्यात नक्षल्यांची दहशत. अशा परिस्थितीत पाहिलीत शिकणारा चिमुकल्या प्रिन्सला दररोज ६ किलोमिटर जंगलातून पायी जावे लागत आहे. त्यात या चिमुकल्याला ‘फिट’चा आजार आहे. कधी वडील तर कधी आई त्याच्या सोबतीला असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, शासनाच्या निर्णयामुळ इतक्या लहान वयात प्रिन्सच्या वाट्याला आलेला संघर्ष मोठाच आहे. सर्वाधिक दुर्लक्षित असल्याने या भागात असे अनेक प्रिन्स संघर्ष करताना दिसून येतात.