नागपूर : २३ वर्षीय तरुण व १९ वर्षीय तरुणीची इंन्स्टाग्रामवर मैत्री झाली. कालांतराने तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध स्थापित केले. तरुणीने लग्नाचा आग्रह धरताच प्रियकराने प्रेयसीला बेल्टने मारहाण करून सिगारेटचे चटके दिले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील तरुणी अजनी परिसरातील असून आरोपी प्रशांत परिहार हा कुंभारटोली, नंदनवन परिसरातील आहे. दोघांची इंन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून १९ एप्रिल २०२० ते २५ एप्रिल २०२३ दरम्यान वेळोवळी तरुणीसोबत शारीरिक संबंध स्थापित केले.

हेही वाचा – भंडारा : माजी आमदार चरण वाघमारे यांच्या हाती भारत राष्ट्र समिती पक्षाचा झेंडा; हैदराबाद येथे कार्यकर्त्यांसह घेतला प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीने लग्नाचा आग्रह धरला. त्यामुळे आरोपीने तरुणीला बेल्टने मारहाण करून सिगारेटचे चटके दिले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह इतर गुन्हे दाखल केले.