अकोला : अनैतिक संबंधात वाद झाल्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीची चाकूने सपासप वार करून हत्या केली व नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील माना येथे मंगळवारी सायंकाळी घडली. अनिल श्रीकृष्ण तायडे (४५ रा. लोहारी, ता. अकोट) असे आरोपीचे नाव असून त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनिल श्रीकृष्ण तायडे याचे माना येथील ३६ वर्षीय महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. यातूनच तो अनेकदा भेटायला जात होता. मंगळवारीही तो त्याच्या प्रेयसीला भेटायला माना येथे येऊन तिच्या घरी गेला व शरीर सुखाची मागणी केली. यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अनिल तायडेने त्याच्या प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही तिच्या पोटावर चाकूचे वार केले. ती मृत झाल्यावर आरोपीने चाकूने स्वतःचा गळा कापून घेतला.

हेही वाचा – राज्यात १०८ क्रमांकाच्या ८१९ रुग्णवाहिका वाढणार, आता ‘बोट’ आणि नवजात शिशू रुग्णवाहिका सेवा

हेही वाचा – वाशिम : ७६ कोटी खर्च तरीही, मागास वस्त्या भकासच?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. पुढील तपास माना पोलीस करीत आहेत.