पुरुषप्रधान संस्कृतीस फाटा, चार मुलींचा पार्थिवाला खांदा; लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप|breaking the patriarchal culture in buldhana four daughters shouldered their father dead body | Loksatta

पुरुषप्रधान संस्कृतीस फाटा, चार मुलींचा पार्थिवाला खांदा; लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप

मुलगा नसल्यामुळे त्यांच्या ४ मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला

पुरुषप्रधान संस्कृतीस फाटा, चार मुलींचा पार्थिवाला खांदा; लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप
पुरुषप्रधान संस्कृतीस फाटा, चार मुलींचा पार्थिवाला खांदा; लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप

बुलढाणा : पुरुषप्रधान संस्कृतीची आणि कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता चौघा बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा व मुखाग्नी देत एक वेगळा पायंडा पाडला. लढाणा तालुक्यातील भादोला गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला.

ग्राम शेतकरी सोसायटीचे सचिव म्हणून काम करणारे पुंजाजी तुकाराम खडेकर यांचे रविवारी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या ४ मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. यावेळी उपस्थित नातेवाईकांसह गावकऱ्यांचे डोळे पाणावले.

हेही वाचा: व्हीव्हीआयपींच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशीच अजगराकडूनही समृद्धीची ‘पाहणी’

कमालीचा संयम अन् हंबरडा!
जिवापाड प्रेम असलेल्या पित्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर या चौघींनी गावकऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्काराची तयारी केली. आशा जाधव, उषा चव्हाण, वर्षा भोंडे, मनीषा भोसले या ४ मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. तोपर्यंत स्थितप्रज्ञ राहून संयमाने सर्व तयारी केली. चिता धडधड पेटल्यावर मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला! त्यांनी हंबरडा फोडत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. यामुळे सर्वांचे डोळे पाणावले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:35 IST
Next Story
व्हीव्हीआयपींच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशीच अजगराकडूनही समृद्धीची ‘पाहणी’