नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवित वाजतगाजत आलेल्या नवरदेवाच्या स्वप्नाचा भंग झाल्याची घटना रोहणा पंचक्रोशीत घडली आहे. सायखेडा येथील तरुणाचा विवाह अमरावती जिल्ह्यातील नवीन वाठोडा गावातील युवतीशी ठरला. पत्रिका वाटून तयार व विवाहपूर्व विधीही आटोपले. सर्वांना तिथीची प्रतीक्षा. दोन्ही कडील मंडळी एक दिवस आधीच रोहना येथील मंगल कार्यालयात दाखल झालेली. तिथीला सर्व वेळेवर हजर झाले.

हेही वाचा >>> नागपूर : नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न, गर्भपातासाठी दवाखान्यात गेल्यावर..

विवाह मुहूर्त होवूनही वधूचा पत्ताच लागत नसल्याने सर्वांची घालमेल सुरू झाली. वर पक्षासह इतर काळजीत पडले तर वधू पक्ष शोधाशोध करू लागला. सकाळी अकराची वेळ आटोपून दुपारचे तीन वाजले. मग मात्र खळबळ उडाली. संताप व्यक्त होत असतांनाच धक्कादायक माहिती पुढे आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वधूने पहाटेची वेळ साधून प्रियकरासोबत पोबारा केल्याचे सर्वांना माहीत पडले. सभागृहात शांततेची जागा संतापाने घेतली. वर व त्याचे आप्त खलबते करीत एका निर्णयावर आले. फसवणूक झाली म्हणून ते थेट पुलगाव पोलीस ठाण्यात पोहचले. हा सर्व प्रकार हसावे की रडावे म्हणून पेचात पाडणारा ठरला तरी नियोजित वधूचा पवित्रा मात्र आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे.