महापालिका निवडणूक
वाढती लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार बघता गेल्या दशकात शहरातील विविध भागात जमिनीच्या किमती झपाटय़ाने वाढून मोठय़ा प्रमाणात बांधकाम व्यावसायिक आणि जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारी लॉबी सक्रिय झाली आहे. त्यातील काही आधीपासूनच राजकारणात आहेत तर काही विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून सक्रिय होऊ पाहत आहेत. महापालिका निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात बांधकाम व्यावसायिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी झाल्यामुळे निवडणुकीमध्ये धनशक्तीचे प्रमाणही वाढणार आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर उपराजधानीत बांधकाम व्यावसायिक आणि जमीन खरेदी- विक्री करणारे अनेकजण राजकारणात सक्रिय झाले. गेल्या दहा वषार्ंपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या काळात अनेक व्यावसायिकांची पक्षाशी जवळीक निर्माण झाली आहे. मिहान किंवा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात उद्योग येऊ लागल्यामुळे गेल्या एक दशकापासून शहर आणि परिसरातील जमिनीच्या किमती वाढल्या आहेत. जमिनीच्या व्यवहारातून अनेकजण श्रीमंत झाले. त्यापैकी काहींनी आता राजकीय पक्षांचा आधार घेतला असल्याने महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्यांच्या यादीवरून स्पष्ट होते. काही पडद्याआडून सक्रिय आहेत. भाजपच्या यादीत विक्की कुकरेजा, सुरेंद्र यादव, शेषराव गोतमारे, मनोज पांडे, रमेश चोपडे, भूषण शिंगणे, सुनील हिरणवार, बापू चिखले, दीपक वाडीभस्मे, बंटी कुकडे, विजय राऊत, बाल्या बोरकर, मेघराज मेघनानी, देवेंद्र मेहर, अजय बुग्गेवार, प्रमोद तभाणे, प्रकाश भोयर यांचा समावेश आहे. शिवाय साधना बरडे यांचे पती नरेश बरडे, लक्ष्मी यादव यांचे पती मुन्ना यादव यांचा बांधकाम व्यावसायिकांच्या यादीत सहभाग आहे.
[jwplayer TopWeolJ]
यासह अनेक उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बांधकाम किंवा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायाशी निगडित आहेत. शिवसेनेमध्ये अनिल धावडे यांच्यासह राय बिल्डर्सच्या कुटुंबातील सदस्यही रिंगणात आहे. काँग्रेसच्या यादीत प्रफुल गुडधे, विकास ठाकरे, विद्या पन्नासे यांचे पती राकेश पन्नासे यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत बांधकाम व्यावसायिकांची लॉबी आणि जमीन खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यावर्षी चार वार्डाचा एक प्रभाग असल्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी त्यांचा खर्च अधिक वाढणार आहे.
महापालिकेच्या राजकारणात ही लॉबी सक्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. गेल्या दोन दशकांतील महापालिकेत झालेल्या निर्णयावर नजर टाकली तर त्यापैकी बरेच निर्णय बांधकाम व्यावसायिकधार्जिणे असल्याचे दिसून येते. यात महापालिकेलगतच्या जागेवरील आरक्षण उठवण्याचाही समावेश आहे. पुढच्या काळात महापालिकेकडून करण्यात येणारी अनेक मोठी कामे या व्यावसायिकांच्या माध्यमातून पूर्ण केली जात असल्यामुळे नगरसेवकांचे महत्त्व बांधकाम व्यावसायिकांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
ही बाब लक्षात घेऊन गेल्या दहा वषार्ंपासून ही लॉबी महापालिकेच्या निवडणुकीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
[jwplayer vr1NXjZ8]