बुलढाणा : बातमीचे शीर्षक वाचून सर्वसामान्य, माताच काय डॉक्टर, प्रसूती तज्ज्ञ वा वैद्यकीय संशोधक देखील अचंबित होणे स्वाभाविअ. पण हे वास्तव आहे. हा प्रकार बुलढाणा नगरीत उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्याचे वैद्यकीय क्षेत्रात या घटनेची चर्चा आहे. बुलढाणा शहरांतील प्रसिद्ध प्रसूती तज्ज्ञ प्रसाद राजकुमार अग्रवाल हे स्थानीय शासकीय महिला रुग्णालयाठी सेवा देतात. त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या बत्तीस वर्षीय आणि नऊ महिन्याच्या गर्भावती महिलेची त्यांनी ‘सोनोग्राफी ‘केली असता त्यांना ‘वेगळेच काही’ आढळून आले! त्यांना तपासणीत महिलेच्या गर्भातील बाळच नव्हे तर बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘असल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी दोन तीनदा तपासणी केली असता बाळाच्या पोटात बाळ असल्याचे स्पष्ट झाली. त्यांनी आपल्या वरिष्ठ आणि काही तज्ञाशी चर्चा केली. गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाले असल्याने तिच्या प्रसूतीला आता अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सदर महिला ही जिल्ह्याच्या घाटाखालील भागातील आहे तिला दोन अपत्य आहेत. महिलेला संभाजी नगर येथे पुढील उप चारसाठी पाठवण्यात आले असून तिथे तज्ज्ञांच्या देखेंरखीत ठेवण्यात आले आहे. फिट्स इन फिटू दरम्यान या संदर्भात ‘लोकसत्ता ‘सोबत बोलताना डॉक्टर प्रसाद अग्रवाल म्हणाले ” बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढण्याचा हा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे. भारतात आजवर अशा दहा ते पंधरा तर जगात दोनशे घटनाची नोंद आहे. यापूर्वी १९८३ मध्ये अशी पहिली घटना उघडकीस आली होती. वैद्यकीय भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे अति दुर्मिळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणत पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजीनगरला रवानगी

डॉ. अग्रवाल म्हणाले, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर झिने,स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील याना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. बाळाच्या पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होते. कुठलाही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसुती सुलभ होण्याकरता आणि पोटातील बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजी नगर याठिकाणी हलविण्यात आले आहे. बाळाच्या पोटात असलेले बाळ पूर्णपणे वाढलेले नाही. जुळे मुले होतांना असा प्रकार होऊ शकतो. बाळाच्या पोटातील मृतप्राय अर्भक काढून टाकता येईल. प्रसुती क्लिष्ट असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा आम्ही निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले.