समृद्धी महामार्गावर अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता नागपूरहून पुण्यााला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ प्रवाशांचा जीव वाचला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. यातील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर, चालक, क्लिनरसह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शीने थरारक प्रसंग सांगितला आहे.

हेही वाचा : लोकजागर : मृत्यूचा ‘समृद्ध’ महामार्ग!

प्रत्यक्षदर्शी वकील संदीप म्हेत्रे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं की, “आम्ही अपघाताच्या ठिकाणी पोहचल्यानंतर पाहिलं, तर भयंकर परिस्थिती होती. आमच्या डोळ्याने लोक होरपळताना पाहत होतो. गाडीने मोठा पेट घेतला होता. गाडीचे दोन टायर बाजूला पडले होते. अपघात झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले की, कोणीतरी थांबेल आणि मदत करेल. मात्र, भावनाशून्य लोक या जगात आहेत. त्यातील कोणीही याठिकाणी थांबले नाहीत.”

“बसमध्ये एक महिला आणि लहान मुलगा होता. अपघातानंतर त्यांना बसच्या मागील बाजूने बाहेर काढण्यात आलं. पण, ते लहान मुल पूर्ण होरपळलेलं पाहून अंगावर शहारे आले. काच फोडण्यासाठी काही मिळालं असते, तर ते लोक वाचले असते,” असं म्हेत्रे यांनी म्हटलं.

हेही वाचा : विश्लेषण : समृद्धी महामार्गावरील अपघात कसे रोखणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अपघात झाल्यानंतर काहीजण बसच्या मागील बाजूला गेले, तर काहीजण समोर आले. ते आतून काचेला जोरात मारत होते. पण, काच न फुटल्याने सर्वजण जागीच होरपळून मृत्यू झाला आहे,” असा दावा दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने केला आहे.