बुलढाणा : इयत्ता बारावीप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याने इयत्ता दहावीच्या निकालातही दमदार कामगिरी करीत अमरावती विभागातून (मंडळ) द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९३.९० इतका लागला असून यावेळीही सावित्रीच्या लेकींनी मुलांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. देऊळगाव राजा जिल्ह्यात प्रथम ठरला आहे.

जिल्ह्यातील ३९,२९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ३८,९८३ जणांनी परीक्षा दिली. यातील ३६,६०७ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ९४ टक्क्यांच्या घरात जाणारी ही टक्केवारी आहे. यातील १२,६२६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १३,८२२ प्रथम, ८,३९९ द्वितीय, तर १,७६० जण पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा नव्याने सिद्ध करणारी ठरली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : काँग्रेसचे मिशन-४२! प्रदेश समितीचे मुंबईत बुलढाण्यासह विदर्भातील नेत्यांशी विचारमंथन; बैठक लोकसभाचा ठरणार ट्रेलर

देऊळगाव राजा तालुका ९७.३७ टक्के निकालासह जिल्ह्यात अव्वल ठरला असून ९६.०१ टक्केसह चिखली दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुलढाणा ९४.७१, मोताळा ९५.४३, सिंदखेडराजा ९५.७९, लोणार ९४.३८ मेहकर ९४.२७, खामगाव ९२.२७, शेगाव ९१.७६, नांदुरा ९१.२४, मलकापूर ९३.१२, जळगाव ९१.१६ व संग्रामपूर ९१.४९ अशी अन्य तालुक्यांची टक्केवारी आहे. निकालात माघारलेल्या ५ तालुक्यांमुळे जिल्ह्याच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा – हातात संविधान घेऊन नवरीची रुबाबात लग्नमंडपात एन्ट्री; भारतीय संविधानाच्या साक्षीने बांधली विवाहाची रेशीमगाठ; भंडाऱ्यातील आदर्श विवाह सोहळा ठरतोय कौतुकाचा विषय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लडकी तो लडकी होती है’

दहावीच्या निकालात जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी ९५.६१ तर मुलांची ९२.४९ इतकी आहे. यामुळे मुलींनी तब्बल तीन टक्क्यांनी मुलांना मागे ढकलले आहे.