बुलढाणा : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घटमंडणीचे बहुप्रतिक्षित निष्कर्ष आज जाहीर करण्यात आले. पीकपाणी सर्वसाधारण राहणार, रब्बीमध्ये गव्हाचे चांगले उत्पादन होणार, असे भाकित वर्तविण्यात आले. लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत टाळले, मात्र ‘राजा’ कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.

आज सकाळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घटमांडणीचे भाकीत जाहीर केले. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी बहुसंख्येने हजर होते. घटमांडणीचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे.

हेही वाचा – राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या प्रतिष्ठित जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड

पाहिला महिना – पाऊस कमी, दुसरा महिना – चांगला पाऊस, तिसरा महिना – भरपूर पाऊस ,चौथा महिना – अवकाळीसारखा दमदार पाऊस राहील. यावर्षी खरीप पिके साधारण राहतील, असे महाराजांनी सांगितले. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यावर रोगराई जास्त प्रमाण येईल व पिकांची नासाडी होईल. रब्बी पिकांमध्ये गहू सर्वात जास्त चांगले पिक राहील.

हेही वाचा – विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी होते घटमांडणी

शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पानसुपारी आणि विविध १८ प्रकारची धान्य विशिष्ट पद्धतीने रचण्यात येतात. अक्षय तृतीयेला संध्याकाळी ‘घट मांडणी’ करण्यात येते. दुसऱ्या दिवशी भाकित वर्तविले जाते. वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. ३५० वर्षांपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. शेतकऱ्यांचा मंडणीवर मोठा विश्वास आहे.