नागपूर : सिव्हील २० इंडिया २०२३ गटामुळे (सी 20) जी २० गटाच्या कार्यकक्षा विस्तारली असून सामाजिक मुद्द्यांचा समावेश होण्यास मोलाची मदत झाली असल्याची भावना आज येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सिव्हील २० इंडिया २०२३ गटाच्या (सी २०) कार्यकारी समितीची बैठक सोमवारी नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये  झाली. या बैठकीला सिव्हील २० इंडिया २०२३ गटाच्या सुकाणू समितीचे  सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आणि सिव्हिल २० इंडिया गटाचे कार्यकारी गट समन्वयक तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सिव्हिल २० इंडिया गटसचिवालयाचे आश्रयदाते या बैठकीला उपस्थित होते.

 बैठकीला उपस्थित असलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये भारतातल्या अमृता विद्यापीठमचे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद, सेवानिवृत्त भारतीय राजदूत आणि सिव्हिल  इंडिया  चे शेर्पा विजय के. नांबियार, निवेदिता भिडे, विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे,  ब्राझीलमधील गेस्टॉस आणि सिव्हिल २० इंडिया  च्या ट्रोइका सदस्य अलेस्सांद्रो नीलो, मार्टिन रेचर्ट्स, लक्झेंबर्गच्या रायझिंग फ्लेम्सच्या सह-संस्थापक आणि संचालक आणि माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस निधी गोयल, हे या बैठकीला उपस्थित होते.

sebi fines former cnbc awaaz anchor analyst rs 1 crore
‘सेबी’कडून माजी अर्थ-वृत्तवाहिनीच्या निवेदकाला कोटीचा दंड
West Bengal BJP workers take shelter in safe houses after polls TMC
निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?
Sangli, Ex-president, society,
सांगली : अनैतिक संबंधातून सोसायटीच्या माजी अध्यक्षाची भरदिवसा हत्त्या
Ghatkopar hoarding collapse
घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण: जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेला अटकपूर्व जामीन देण्यास नकार
inauguration of the workshop under the guidance of IPS Officer Tejashwi Satpute
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे उद्घाटन; करिअरच्या संधींचा भविष्यवेध आजपासून
Important project works to Megha Engineering in procurement of election bonds
मेघा इंजिनीअरिंगला नवे कंत्राट; निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनीकडे महत्त्वपूर्ण प्रकल्पातील कामे
reserve bank of india board approves dividend of rs 2 11 lakh crore to government for fy24
रिझर्व्ह बँकेचा केंद्राच्या तिजोरीला हातभार; आजवरचा सर्वाधिक २.११ लाख कोटींचा लाभांश मंजूर
Selection process of new chairman of State Bank delayed
स्टेट बँकेच्या नवीन अध्यक्षांची निवड प्रक्रिया लांबणीवर; लोकसभा निकालानंतरच उमेदवारांच्या मुलाखतींची शक्यता

हेही वाचा >>> नागपूरमध्ये सी-२० बैठकीला सुरूवात, देश विदेशातील प्रतिनिधींची उपस्थिती

वेळ, प्रयत्न आणि परमेश्वराची आराधना या बाबी आपल्या जगण्याचे सर्वात महत्वाचे अंग असल्याचे  सांगून स्वामी अमृतस्वरूपानंद म्हणाले, अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सरकारने तळागाळातील  सर्वसामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धोरणांच्या माध्यमातून याच तत्वाचे पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.