नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे कोट्यधीश तर भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार हे लक्षाधीश आहेत.

उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार झाडे यांच्याकडे एक कोटी ८९ लाख २० हजार १७२ रुपयांची चल, अचल संपत्ती आहे. झाडे यांच्याकडे स्वत:च्या चल संपत्तीचे बाजारमूल्य ७७ लाख २३ हजार ३५७ तर पत्नीकडे असलेल्या चल संपत्तीचे मूल्य २४ लाख २० हजार १७२ रुपये आहे. झाडे यांची स्वत:ची अचल संपत्ती २३ लाखांची आहे आणि पत्नीकडे ६५ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे एक चारचारकी वाहन (१० लाख)आहे. यांच्यावर कुठल्याही गुन्हयाची नोंद नाही.

raver lok sabha seat, Raksha Khadse increase in assets, Eknath Khadse s loan of 23 lakhs on Raksha Khadse, seven and a half crores, marathi news, lok sabha 2024, raver lok sabha 2024,
रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ
Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
Aslam shah
उमेदवारी अर्जासाठी १० हजारांची चिल्लर; नाणी मोजताना अधिकाऱ्यांना एसीतही फुटला घाम, मोजणी संपल्यानंतर…

हेही वाचा >>> नागपूर: फडणवीस यांच्या डीपीसीच्या झटपट बैठकीत काय ठरले?

 विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्याकडे चल आणि अचल मिळून ५६ लाखांची मालमत्ता आहे. गाणार निवृत्ती वेतनधारक असून त्यांचे २०१८-१९ मध्ये वार्षिक उत्पन्न २१ लाख ७५ हजार ५८९ रुपये होते तर २०२२-२३ ला त्यात वाढ होऊन ३५ लाख ७० हजार १७० रुपयांपर्यंत गेले. त्यांच्या पत्नीकडे ६० ग्रॅम सोने (बाजारमूल्य तीन लाख ३६ हजार) आहे. गाणार यांच्याकडे १४०० चौरस फूट बांधकाम असलेले घर आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या  गुन्ह्यांची नोंद नाही.