लोकसत्‍ता टीम

अमरावती : भरधाव कारचा टायर फुटल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात पिता-पुत्रासह तिघांचा मृत्‍यू झाला, तर पाच जण जखमी झाले. हा अपघात भातकुली नजीक सोमवारी रात्री घडला. जखमींवर सध्‍या रुग्‍णालयात उपचार सुरू आहे.

nanded 4 died
नांदेडमध्ये चौघांचा मृत्यू; दोघांचा बुडून तर दोघे अपघातात ठार
Chandrapur 2 deaths marathi news
चंद्रपूर: कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Kolhapur, car, Hit and run,
VIDEO : कोल्हापुरात भीषण अपघातात मोटारचालकासह तिघांचा मृत्यू
pune accident police patil minor daughter hit bike while driving pickup van in shirur
पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप; पिकअप चालवताना दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू
pune porsche car type accident
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतानाच आणखी एक अपघात; भरधाव बीएमडब्लूची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
women died, dumper,
अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, वसईत दोन अपघातांत तिघांचा मृत्यू
pune porsche accident case
पोर्श अपघात प्रकरणी मोठी अपडेट! अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह बार मालक आणि मॅनेजरलाही अटक
Buldhana, animal hit vehicle,
बुलढाणा : भरधाव वाहनाला ताकदवान रोहीची धडक, चालक जागीच ठार

कलीम खान सलीम खान (३६), सलीम खान मेहमूद खान (६५) आणि रुबिना परवीन कलीम खान (३२) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.

आणखी वाचा-गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

कलीम खान हे आपल्‍या कुटुंबीयांसमवेत अकोला येथून अमरावतीकडे येत होते. भातकुलीनजीक त्‍यांच्‍या कारचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणात कार अनियंत्रित होऊन उलटली. अपघात एवढा भीषण होता की कार तीन ते चार वेळा उलटून रस्‍त्‍याच्‍या कडेला शेतात शिरली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्‍यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्‍थानिक नागरिकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. अपघाताची सूचना पोलिसांना देण्‍यात आली. रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.