बुलढाणा : समृद्धी महामार्गावर आज दुपारी झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. मेहकर परिसरातील पिंप्री माळी नजीक हा अपघात घडला. हेही वाचा - बुलढाणा: मलकापूर शहरातील ‘मातोश्री जिनिंग’ ला आग; शेकडो क्विंटल कापूस जळाला उत्तर प्रदेशमधील (यूपी ५० बीपी ७१८१ क्रमाकाचे) मालवाहू वाहन नागपूरकडे जात होते. यावेळी चालकाला डुलकी लागल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामुळे चालक दिनेश तिवारी (४५, राहणार आझमगड, उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा 'रस्ता संमोहन'चा बळी असल्याची चर्चा होत आहे. या घटनेचा विस्तृत तपशील कळू शकला नाही.