वाशीम : शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला विविध टेबल दिसतात. मात्र, येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्यानंतर तेथील चित्रशाखेत चक्क कॅरम बोर्डचा टेबल दिसतो. आता इथे हा कॅरम बोर्ड लावला कशासाठी? तर कोणीही सांगेल खेळण्यासाठी. मात्र, कर्मचारी म्हणतात आम्ही खेळत नाही. मग कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी हा कॅरम बोर्ड आहे की काय, अशी चर्चा सध्या शहरवासीयांमध्ये रंगली आहे.

क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील चित्रशाखेत कॅरम बोर्ड लावण्यात आला आहे. कार्यालयात येणारे-जाणारे नागरिक हा कॅरम बोर्ड पाहून चकित होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग. या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते बांधकाम, देखभाल, दुरुस्ती आणि रस्त्याच्या समस्यांबाबत कार्य केले जाते. यासोबतच प्रशासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने व इतर महत्त्वाचे शासकीय बांधकामे यांचे सूपर व्हीजन करण्याचे कामही येथूनच चालते. जिल्ह्यातील रस्त्याची स्थिती आजघडीला पूर्णतः खड्डेमय झाली असून, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. असे असताना मात्र बांधकाम विभागाच्या चित्रशाखेतील हा कॅरम बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

हेही वाचा – अकोला : अवैध सावकारी व आर्थिक फसवणुकीतून गेला युवकाचा बळी; १३ दिवसानंतर…

हेही वाचा – धक्कादायक! चक्क जीएमसीमध्ये आला जखमी अजगर; पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅरम बोर्डच्या टेबलवर लाईटदेखील सुरू असतो. बाजूला खुर्च्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांना विचारणा केली असता, हे मला कसे दिसले नाही, बघून घेतो, असे त्यांनी सांगितले.