वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’तर्फे शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लाखो उमेदवारांसाठी हा मोठा दिलासा आहे. यात उत्तीर्ण उमेदवार विविध प्राथमिक आणि देशभरातील केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय मंडळाच्या सीबीएसई, सीआयएससीई, एनआयओएस, आदी माध्यमिक शाळांमध्ये नोकरी साठी प्रयत्न करू शकतात.

हेही वाचा… अकोला : रक्षक बनला भक्षक; बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर…

हेही वाचा… यवतमाळ : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे मनीष पाटील विजयी, भाजपा-शिंदे-पवार गटाच्या उमेदवारास केवळ सहा मते

उमेदवारांना या परीक्षेचा निकाल सीटीइटी डॉट एनआयसी डॉट इन या लिंकवर पाहता येईल. यशस्वी उमेदवारांना मंडळाकडून प्रमाणपत्र मिळणार असून त्या आधारे ते नोकरीसाठी पात्र ठरतील. जुलै २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.