अमरावती : भारतीय रेल्वेने सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशाने सौर पॅनेल लावण्यावर भर दिला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्‍य रेल्वेने आतापर्यंत छतावर सौरऊर्जा (रुफटॉप सोलर) निर्मिती पॅनेलच्‍या माध्‍यमातून ८.११ मेगावॅट ऊर्जा निर्मिती स्‍थापित केली असून अतिरिक्‍त ४ मेगावॅटचे लक्ष्‍य ठेवण्यात आले आहे.

ऑक्‍टोबर महिन्‍यात मध्‍य रेल्‍वेच्‍या विविध स्‍थानकांवर ८५ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसविण्‍यात आले आहेत. मुंबई विभागातील कळंबोली येथे २० किलोवॅट, पुणे विभागातील रुकडी येथे २० किलोवॅट आणि मसूर येथे २५ किलोवॅट, नागपूर विभागातील चांदूर बाजार येथे २० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्‍प स्‍थापित करण्‍यात आले आहेत. विविध ८१ ठिकाणी १ मेगावॅट क्षमतेच्‍या सौर ऊर्जा प्रकल्‍पांसाठी कामे सुरू करण्‍यात आली आहेत. नागपूर विभागातील अजनी येथे १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्‍प उभारला जात आहे. पुणे विभागामध्‍ये १ मेगावॅटचा प्रकल्‍प प्रगतीपथावर आहे. रेल्‍वेची विनावापर आणि मोकळी जागा सौर ऊर्जा प्रकल्‍पांच्‍या उभारणीसाठी शोधली जात आहे.

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

हेही वाचा – नागपूर : महामेट्रोच्या अधिकारी भरती घोटाळ्याची चौकशी करा, अजित पवार गटाची मागणी

हेही वाचा – ‘अँटीमायक्रोबिल रेझिस्टन्स’चा मानवासह प्राणी, वनस्पतींनाही धोका, इंडियन मेडिकल असोसिएशनचा दावा

मध्‍य रेल्‍वेने पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा लाभ घेण्यासाठी, मोकळ्या जमिनींवर सौरऊर्जा उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.