नागपूर: नागपूरसह देशभरात मध्यंतरी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु लग्नसराईच्या काळात हे दर हळू हळू कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. गुरूवारी (२ मे) नागपुरात सोन्याचे दर प्रथमच ७२ हजार प्रति दहा ग्रामहून खाली आले. गरीब- मध्यमवर्गीय व श्रीमंत अशा सगळ्याच गटात लग्न समारंभ उत्साहात साजरा केला जातो. लग्नानिमित्त वर-वधूला प्रत्येक कुटुंब त्यांच्या क्षमतेनुसार सोन्याचे दागिने घेतात. सोन्याचे दर मध्यंतरी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजारांवर गेले होते. परंतु, गेल्या काही आठवड्यापासून हळू- हळू हे दर खाली घसरतांना दिसत आहे. २ मे रोजी नागपुरात दुपारी १ वाजता सोन्याचे दर ७२ हजाराहून कमीवर खाली आले.

हेही वाचा : नागपूर: तळपत्या उन्हातही टेकडी गणपती मंदिर परिसर थंडा थंडा कुल कुल… स्प्रिंकलरमुळे भाविक गारेगार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २ मे रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर १ किलोसाठी ८० हजार ८०० रुपये होते. हे दर २५ एप्रिलला २४ कॅरेटसाठी ७२ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रतिकिलो ८० हजार ७०० रुपये होते. तर सोन्याचे दर २० एप्रिल २०२४ रोजी ७४ हजार १००, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार २०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रतिकिलो ८४ हजार १०० रुपये होते. एन् लग्नाच्या काळात हे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने या कुटुंबियांना मोठी दिलासा मिळाला आहे. निश्चितच त्यामुळे प्रत्येक कुटुंब त्यांच्या बजेटप्रमाने सोन्याचे दागीने खरेदी करत असल्याचे चित्र शहरातील सगळ्याच सराफा व्यवसायिकांकडे दिसत आहे.