चंद्रपूर: लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात २ लाख ६० हजाराच्या विक्रमी मताधिक्याने जिंकणाऱ्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहाही विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळाले आहे.

सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतल्याने ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी कठीण आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार येथे माघारले आहे, तर वणी व आर्णी या भाजपाचे वर्चस्व असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघातही भाजपा अतिशय कमी मते पडल्याने मुनगंटीवार, बोदगुरवार, डॉ. संदीप धुर्वे, किशोर जोरगेवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक धोक्याची घंटा आहे.

bjp meeting
लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भाजप आमदारांना भोवणार? ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर खल
Caste, Latur, Latur latest news,
लातूरमधील जातीची गणिते बदलली
mahayuti, pune, Shivsena,
पुणे : शहरात महायुतीमध्ये तिढा, शिवसेनेकडून तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा
Congress flag
काँग्रेसची उमेदवारी हवी, तर अर्जासोबत द्यावा लागणार पक्ष निधी
is Congress building a front on 288 seats on its own for the assembly elections
आघाडीत बिघाडी होणार…? काँग्रेसकडून सर्व २८८ जागांवर…
Gondia Legislative Assembly,
गोंदिया विधानसभेवर विद्यमान अपक्ष आमदारासह यांचाही दावा
ramesh keer, Congress, niranjan davkhare,
काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर

हेही वाचा – अमरावती : सरपंच ते खासदारकीचा प्रवास! बळवंत वानखडेंच्या राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख

या लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, राजुरा, बल्लारपूर या चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहापैकी बल्लारपूर, वणी व आर्णी या तीन विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे भाजपाचे नेते तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, संजीव बोदगुरवार रेड्डी व संदिप धुर्वे प्रतिनिधित्व करतात तर राजुरा विधानसभेतून काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे व वरोरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर चंद्रपूर विधानसभेत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार प्रतिनिधित्व करतात. सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला प्रचंड मते मिळाल्याने भाजपाला आगामी विधानसभा निवडणूक कठीण आहे. वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना १ लाख २५ हजार ७२१ मते मिळाली तर भाजपचे मुनगंटीवार यांना ६९ हजार १३३ मते मिळाली.

वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला ५६ हजार ६४८ मतांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार स्व. बाळू धानोरकर २ हजार मतांनी माघारले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या धानोरकर यांना मिळालेले मताधिक्य भाजपाची चिंता वाढविणारे आहे. २०१९ लोकसभेत आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे हंसराज अहीर यांना ५९ हजार मतांचे मताधिक्य होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार धानोरकर यांना १ लाख १४ हजार ८५ मते मिळाली आहेत. तर मुनगंटीवार यांना ९४ हजार ५२१ मते मिळाली आहेत. येथे काँग्रेसला १९ हजार ५६४ मतांची आघाडी आहे. त्यामुळे भाजपाचे धुर्वे यांना २०२४ ची विधानसभा निवडणूक धोक्याची आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या धानोरकर यांना १ लाख ३० हजार ५५४ मते मिळाली तर मुनगंटीवार यांना ७१ हजार ६५१ मते मिळाली. काँग्रेसला येथे ५८ हजार ९०३ मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसला ही आघाडी फायद्याची असली तरी विधानसभा निवडणुकीत येथे शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. २०१९ ची निवडणूक काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी धानोरकर यांना विक्रमी मताधिक्याची आघाडी मिळाल्यानंतरही केवळ अडीच हजार मतांनी जिंकली होती. आता तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी ॲड. चटप यांनाही विधानसभेत मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काँग्रेसला मताधिक्य मिळाल्यानंतरही विधानसभा निवडणूक येथे रंजक होणार आहे. तर बल्लारपूर, वरोरा चंद्रपूर या तीन विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने प्रचंड मतांची आघाडी घेतली आहे. बल्लारपूर या मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या धानोरकर यांना १ लाख २१ हजार ६२५ मते मिळाली तर मुनगंटीवार यांना ७३ हजार ४५२ मते मिळाली. येथे मुनगंटीवार ४८ हजार २०० मतांनी मागे आहेत. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धोका आहे.

हेही वाचा – वडिलांची लाखांमध्ये कमाई तरीही मुलाला ‘आरटीई’तून प्रवेश! आणखी एका पालकाला अटक

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या धानोरकर यांना १ लाख १९ हजार ८११ मते मिळाली तर मुनगंटीवार यांना ८९ हजार ४८४ मते मिळाली. मुनगंटीवार यांच्यासोबत अपक्ष जोरगेवार होते. त्यामुळे अपक्ष आमदार किशाेर जोरगेवार यांच्यासाठी आगामी विधानसभा कठीण आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोट्यावधीची विकास कामे केली असतानाही बल्लारपूर व मूल या दोन्ही शहरात काँग्रेसच्या तुलनेत भाजपाला अतिशय कमी मते मिळाली आहे. हीच स्थिती चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातही आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार महायुतीत सहभागी आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या विनंतीवरून आमदार जोरगेवार यांनी अखेरच्या दिवशी मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. मात्र या प्रचार सभेचा काही एक फायदा मुनगंटीवार यांना झाल्याचे दिसले नाही. चंद्रपूर विधानसभेत काँग्रेसच्या आमदार धानोरकर यांना प्रचंड मतांची आघाडी असल्याने आगामी विधानसभा जोरगेवार यांच्यासाठी कठीण आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजप माघारल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरगेवार कोणत्या पक्षाचा हात धरतात हे बघण्यासारखे आहे. वरोरा या धानोरकर यांच्या स्वतःच्या मतदार संघात काँग्रेसला १ लाख ४ हजार ७५२ मते मिळाली तर मुनगंटीवार यांना ६७ हजार ७०२ मते मिळाली.

येथे काँग्रेसने ३७ हजार ५० मतांची आघाडी घेतली. काँग्रेस पक्षासाठी हा मतदारसंघ अतिशय अनुकूल आहे. मात्र धानोरकर येथे कोणाला उमेदवारी देतात यावर देखील बरेच काही अवलंबून आहे. सध्यातरी सहाही विधनसाभा मतदारसंघात भाजपला धोका आहे.

प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

विधानसभा – मते
राजुरा – १,३०,५५४
चंद्रपूर – १,१९,८११
बल्लारपूर – १,२१,६५२
वरोरा – १,०४,७५२
वणी – १,२५,७८१

आर्णी – १,१४,०८५

सुधीर मुनगंटीवार (भाजप)

विधानसभा – मते

राजुरा – ७१,६५१
चंद्रपूर – ८०,४८४
बल्लारपूर – ७३,४५२
वरोरा – ६७,७०२
वणी – ६९,१३३

आर्णी ९४,५२१

सहा विधानसभा मतदारसंघात भाजपची पिछाडी

१) राजुरा मतांची पिछाडी – ५८९०३
२)चंद्रपूर मतांची पिछाडी- ३९३२७
३)बल्लारपूर मतांची पिछाडी- ४८२००
४)वरोरा मतांची पिछाडी- ३७०५०
५)वणी मतांची पिछाडी- ५६६४८
७)आर्णी मतांची पिछाडी- १९५६४