चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. डोंगरे गेल्या काही वर्षांपासून आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्यासोबत दिसत होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. डोंगरे यांच्या भाजप प्रवेशात भांगडिया यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. यावेळी, माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, राजू देवतळे, राजू पाटील झाडे, मनीष तुंपलीवार, डॉ. शाम हटवादे, कमलाकर लोनकर, ओम पाटील गणोरकर, पार्थ भांगडिया व इतर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंगरे यांचा भाजप प्रवेश हा वडेट्टीवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. यापूर्वी वडेट्टीवार यांचे विश्वासू ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे आणि नगरसेवक विलास विखार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.