MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.०५ टक्के लागला असून विभागात पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्हा निकालात पिछाडीवर गेला आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परिक्षेसाठी रेगुलर, प्रायव्हेट, आयसोलेटेड मिळून एकूण २८ हजार २४२ मुला-मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ४८ मुला-मुलींनी परिक्षा दिली. त्यातून २६ हजार २३८ मुले – मुली पास झाल्या आहेत.

निकालात मुलींनी बाजी मारली असून ९५.८५ टक्के मुलींनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. तर, ९१.३७ टक्केच मुले दहावीच्या परीक्षेत पास झाले आहे. मुलांपेक्षा मुलींवर वरचढ ठरल्या आहे. विद्या निकेतन कॉन्व्हेन्टचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

हेही वाचा : आयपीएलमध्ये विदर्भातील खेळाडुंनी कशी कामगिरी केली? वाचा…

महापालिका शाळेचा निकाल ९८ टक्के

चंद्रपूर:महापालिकेच्या पी. एम. श्री सावित्रीबाई फुले शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात मनपा शाळेचा शैक्षणिक स्तर सातत्याने उंचावत असुन मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्या योगदानाने उत्कृष्ट निकाल देण्यात मनपा शाळा यशस्वी होत आहे. एकीकडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी होत असतांना बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळा याला अपवाद ठरली आहे. येथे असलेली हजाराच्यावर विद्यार्थी संख्या, शाळेची गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण आणि विशेष म्हणजे इंग्रजी कॉन्व्हेंट सोडून येथे शिक्षण घेत आहेत. या परीक्षेत शाळेतील दिव्यांग विद्यार्थी साहिल मावलीकर यांने ७१ टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. याच शाळेत सन २०१४ मध्ये केवळ १०० विद्यार्थी संख्या होती. तर आज ११०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे.

हेही वाचा : नागपूर विभागाच्या दहावीच्या निकालात वाढ, मात्र क्रमवारीत घसरण; गोंदिया जिल्हा अव्वल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉन्व्हेंट सोडून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा काही वर्गात लक्षणीय आहे, ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शासकीय मराठी शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यामुळे आणि महानगरपालिका प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शाळेने हा मैलाचा दगड पार केला आहे. मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अति.आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा यशाचे नवीन टप्पे गाठत असुन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत, वर्ग शिक्षक अरूण वलके ,विषय शिक्षक सचिन रामटेके,भास्कर गेडाम ,मोनाली भोयर, बबली जंगम सर्व शिक्षक वृंद तसेच आपल्या आई वडीलांना दिले आहे.