MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता दहावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी राज्यात सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. निकालाची टक्केवारी ९४.७३ नोंदवण्यात आली. बारावीप्रमाणे दहावीतही गोंदिया जिल्हा विभागामध्ये ९६.११ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे.

नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ५१ हजार २ परीक्षार्थींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सर्वाधिक ५८ हजार ९८६ विद्यार्थी नागपूरचे होते. त्यापैकी विभागातून १ लाख ४९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १ लाख ४२ हजार ५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विभागात बारावीप्रमाणे दहावीतही मुलींचा वरचष्मा कायम आहे. दहावीत ७६ हजार ६९२ मुले तर ७३ हजार २०५ मुली अशी एकूण १ लाख ४९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७१ हजार १७८ मुले तर ७० हजार ८२७ मुली उत्तीर्ण झाल्यात. त्यात मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.८१ तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.७५ इतकी आहे.

nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur in seven constituencies After 77 candidates withdrew 102 candidates remain
यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
National Commission for Medical Sciences is aggressive about MBBS admission
एमबीबीएस प्रवेशाबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आक्रमक
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी

हेही वाचा : धक्कादायक : पानपट्टीचालकाची कुकरीने वार करून हत्या, बुलढाण्याच्या खामगावमधील थरार

गोंदिया जिल्हा अव्वल

दहावीच्या निकालात बारावीप्रमाणेच यंदाही गोंदिया जिल्ह्याने टॉप केले. निकालात ९५.६२ टक्क्यासह जिल्ह्याने प्रथम स्थान पटकाविले. त्यापाठोपाठ भंडारा जिल्ह्याने ९४.७५ टक्क्यासह दुसरे तर नागपूर जिल्‍ह्याने ९४.३३ टक्क्यासह तिसरे स्थान पटकाविले. गडचिरोली जिल्ह्याने ९४.२२ टक्क्यासह चौथे, चंद्रपूरने ९३.५४ टक्क्यासह पाचवे तर वर्धा जिल्ह्याने बारावीप्रमाणे दहावीतही ९१.४६ टक्क्यासह शेवटले स्थान पटकाविले आहे.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकासाठी ११ जूनपर्यंतची मुदत

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास त्यांना गुणपडताळणी आणि ११ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.याशिवाय उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागविण्यासाठीही ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यंदाही बोर्डाकडून श्रेणीसुधार, गुणसुधार योजना सुरू असून विद्यार्थ्यांना त्यांना जुलै-ऑगस्टदरम्यान होणाऱ्या परीक्षेत सहभागी होता येईल.

हेही वाचा : सुवर्णवार्ता : सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

जिल्हानिहाय निकाल

जिल्हा -नोंदणी – परीक्षेत बसलेले – उत्तीर्ण – टक्केवारी
गोंदिया- १८,२३४ – १८,१६० – १७,४५५ – ९६.११

भंडारा – १६,०२५ – १५,९७१ – १५,२३८ – ९५.४१
गडचिरोली – १४,३०५ – १४,०२५- १३,२७८ – ९४.६७

हेही वाचा : अग्निसुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा कमकुवत! नागपुरातील २१९ उद्योगांमध्ये…

नागपूर – ५८,९८६ – ५८,६२४- ५५,७९८ – ९५.१७
चंद्रपूर- २७,५९२ – २७,४०४ – २५,७७६ – ९४.०५

वर्धा – १५,८६० – १५,७१३ – १४,४६० – ९२.०२