चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जाग्यावर १९८४ पासून शेती करित आहेत. सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमिनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे. सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून शनिवारी (ता. १) वनअधिकारी व वनकर्मचारी वारंवार अतिक्रमण काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांवर दबाव टाकत होते.

हेही वाचा >>> चंद्रपूर: ‘डीएनआर’च्या ‘कॅप्सुल टँकर’ने घेतला दोन युवकांचा बळी; संतप्त ग्रामस्थांचे पाच तासांपासून ‘रस्ता रोको’ आंदोलन

हेही वाचा >>> अमरावती : नवदुर्गांचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन तरुण ठार, एक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनकर्मचाऱ्यांनी उभे पीक असलेल्या शेतात येऊन अतिक्रमण काढण्यासाठी बजावले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी पिकाचेही नुकसान केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याचाच धसका घेत आज रविवारी सकाळच्या सुमारास गणपती सोनुने यांनी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीयांना माहिती होतात त्यांनी गणपतीला रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.