चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर गावालगतच्या बॉटनिकल गार्डन जवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

हे देखील वाचा – अकोला : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना तरुणीचा मैदानातच मृत्यू

मंगळवार (२३ ऑगस्ट) रोजी बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिले होते. त्यानंतर सायंकाळी दोन पिंजरे व चार ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर बुधवारी (२४ ऑगस्ट) रात्री ९ वाजताच्या सुमारास विसापूर गावालगत बॉटनिकल गार्डनजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.

हे देखील वाचा – नागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली सुपारी

बिबट्याची रवानगी वन्य प्राणी उपचार केंद्रात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावून बिबट जेरबंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी सांगितले.