चंद्रपूर: विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, या उद्देशाने चीचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी.एफ.टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद (ई. पी.स.एच) या संस्था एकत्र येऊन विदर्भातील बांबू उद्योजक, बांबू कारागीर समूह यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन वन अकादमी येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या कार्यशाळेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांतून ८० बांबू उद्योजक व कारागीर सहभागी झाले होते.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर डी.जी. एफ. टी. च्या सहाय्यक निदेशक स्नेहल ढोके, वन प्रबोधनीच्या अपर संचालक मनिषा भिंगे, मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी सुधीर आकोटकर, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे, महिला आर्थिक विकास मंहामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, पंधरे, बी.आर.टी.सी.चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी. मल्लेलवार आदी हजर होते.

Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : उत्तर निसर्गकेंद्री विकासाचे…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

हेही वाचा – सावधान! गोंदिया जिल्ह्यातील ‘या’ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

प्रास्ताविकेत बोलताना सहायक निदेशक स्नेहल ढोके म्हणाल्या, जगातील हस्तकला वस्तूच्या व्यापारात भारताचा ४० टक्के वाटा असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबू हस्तकला वस्तूची बरीच मागणी आहे. विदर्भातील या बांबू वस्तूची निर्यात वाढविण्यासाठी डी.जी.एफ. टी. कार्यालयातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय व्यापारात विदर्भातील बांबू वस्तूची विक्री ही मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या योजनांचा  फायदा बांबू उद्योजक व कारागीर यांनी घेतला पाहिजे असे आवाहन, वन प्रबोधिनीच्या अप्पर संचालक मनिषा भिंगे यांनी केले. तज्ञ मार्गदर्शक तथा ई.पी.सी.एच.चे सहायक निदेशक क्रिष्णा चंदर यांनी हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी आकोटकर यांनी देशभरात डाक विभागाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून हस्तशिल्प व्यापारासाठी डाक विभागाने अनेक योजना तयार केल्या आहेत. त्याचा फायदा बांबू उद्योजक व कारागीरांनी घ्यावा. तसेच या कार्यशाळेत उपस्थितांसमक्ष बी.आर.टी.सी. सोबत सामंजस्य करार केला.

हेही वाचा – सावधान! गोंदिया जिल्ह्यातील ‘या’ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी बी.आर. टी.सी. व माविम या विभागांनी एकत्र येऊन सामूहिक उपयोगिता केंद्राच्या माध्यमातून महिला बांबू कारागिराच्या रोजगार निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे यांनी बांबू उद्योजक व कारागीरांचे उद्योग वाढीसाठी बँक बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य योजनांची संक्षिप्त माहिती  दिली. तर अमेझॉन ग्लोबलचे यश दवे यांनी बांबू वस्तूच्या विक्रीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली.

Story img Loader