चंद्रपूर : घुग्घुस येथील रामनगरात वास्तव्यास असणाऱ्या अवघ्या १९ महिन्यांच्या सुरवी समिंद्र साळवे या चिमुकलीने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास घडवला आहे. १९ महिन्यांची सुरवी तब्बल ९८ वस्तू ओळखत असून तिच्या या तल्लख बुद्धीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली आहे. सुरवीची इंडिया बुकमध्ये नोंद झाल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील तिच्या राहत्या जात तिची भेट घेत अभिनंदन केले आहे.

समिंद्र साळवे हे घुग्घुस येथे वास्तव्यास असून त्यांना १९ महिन्यांची सुरवी नावाची मुलगी आहे. लहानपणापासूनच तिची बुद्धी तल्लख असल्याने तिला वस्तू ओळख करून देण्याची सुरुवात कुटुंबीयांनी लावली होती. सुरवी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास घडवत तब्बल ९८ वस्तू ओळखत असून तिच्या या तल्लख बुद्धीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली आहे.

हेही वाचा…विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरवीच्या घरी तिची भेट घेत अभिनंदन केले आहे. यावेळी सुरवीने चित्रातील अनेक वस्तू, पक्षी ओळखून दाखवले. यावेळी जोरगेवार म्हणाले, की लहान वयात मुलीवर चांगले संस्कार करणारे आणि तिच्या ठायी असणारी बुद्धिमत्ता ओळखणारे पालकही कौतुकास पात्र आहेत.तिचे हे यश नक्कीच अभिमानास्पद असून या चिमुकलीने भविष्यात चंद्रपूरचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करावे. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.