नागपूर: शासनाकडून विविध सोयी- सुविधा घेऊन धर्मादाय रुग्णालये उभारली जातात. परंतु येथे गरीब रुग्णांना नियमानुसार माफक दरात उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. या समस्येवर ‘आरोग्य अधार’ ॲपमुळे तोडगा निघणार आहे. ॲपवर एका क्लिकवर कुणालाही जवळच्या धर्मदाय रुग्णालयाची स्थिती कळेल.  

हेही वाचा >>> उपराजधानी नागपूर राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायद्याने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक आहे. परंतु रुग्ण धर्मदाय रुग्णालयात गेल्यास तेथे आवश्यक खाटा भरल्याचे सांगत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. या प्रश्नावर ‘आरोग्य आधार’च्या मदतीने उत्तर शोधण्याचे प्रयत्न होणार आहे. त्यावर मंत्रालयात बैठक झाली. यावेळी धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा घेतला गेला. याप्रसंगी आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते. बैठकीत ॲपमुळे सामान्यांना जवळचे धर्मदाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. ॲपच्या मदतीने वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.