नागपूर : “छोटा मटका” हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील एक प्रमुख नर वाघ आहे. तो त्याच्या प्रभावशाली स्वभावासाठी आणि प्रादेशिक वादांसाठी ओळखला जातो. तो प्रसिद्ध वाघीण “छोटी तारा” आणि शक्तिशाली वाघ “मटकासुर” यांचा मुलगा आहे. “छोटा मटका” या वाघाने “मोगली” आणि “बजरंग” या दोन वाघांसह इतर प्रभावी वाघांकडून आलेल्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्याने एका विशाल प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे.

“छोटा मटका”चे संगोपन

“छोटा मटका” या वाघाचे संगोपन त्याची आई वाघीण “छोटी तारा” हिने केले. जी तिच्या कणखरपणासाठी आणि संगोपन करणाऱ्या स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे “छोटा मटका” या वाघाने तिच्या सावध नजरेखाली आणि त्याचे वडील “मटकासुर” या वाघाच्या सभोवताल फिरत जंगलाचे मार्ग ओळखले.

“छोटा मटका”च्या लढाया

“छोटा मटका” या वाघाने इतर प्रभावी नर वाघांसोबत अनेक प्रादेशिक वाद आणि भयंकर लढाया केल्या आहेत. त्यातील गाजलेल्या लढाया म्हणजे “मोगली” आणि “छोटा मटका”. यात “मोगली” हा वाघ “छोटा मटका” एवढाच शक्तिशाली होता. पण “मोगली”च्या साम्राज्यावर अतिक्रमण करत “छोटा मटका”ने अखेर त्याला नमवले. तर “बजरंग” हा वाघ देखील आजपर्यंत एकही लढाई हरलेला नव्हता, तरीही “छोटा मटका”ने त्याला नमवलेच नाही, तर थेट यमसदनी धाडले. या लढाईचे अनेक पर्यटक साक्षीदार होते. तर ताडोबा-अंधारी व्याघरप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील आणखी एका वाघाला “छोटा मटका”ने लढाई करत यमसदनी धाडले.

“छोटा मटका”चे अधिराज्य

अनेक आव्हानांना तोंड देऊनही, “छोटा मटका” या वाघाने नवेगाव कोर बफरसह एका विशाल प्रदेशावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तो त्याच्या ताकदीसाठी, चपळाईसाठी आणि अनुकूलतेसाठी ओळखला जातो. हे साम्राज्य त्याने “मोगली”ला नेस्तनाबूत करून मिळवले. आजतागायत त्याच्या या साम्राज्यात घुसखोरी करणाऱ्या एकाही वाघाला त्याने टिकू दिले नाही. एक तर त्याला हाकलून लावले आणि दुसरे म्हणजे जखमी केले, मृत्यूच्या दारी पाठवले.

“छोटा मटका”च्या आयुष्यातील संघर्ष

“छोटा मटका” या वाघाचा प्रवास संघर्षांशिवाय राहिला नाही. त्याने त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच त्याचा भाऊ “ताराचंद” याचे दुःखद निधन अनुभवले. असे असूनही, तो एक बलवान आणि धाडसी वाघ बनला. आव्हानांवर मात करत आणि ताडोबात एक प्रमुख वाघ म्हणून स्वतःला स्थापित केले. अनेक लढायांमुळे तो जखमी झाला आहे. त्याच्या पायाला कायमचे दुखणे लागले आहे. तरीही तो खंबीर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“छोटा मटका”चे पितृत्व “छोटा मटका”ला त्याच्या वडिलांच्या अद्वितीय भूमिकेसाठी देखील ओळखले जाते. तो त्याच्या अधिवासाचे कठोरपणे रक्षण करतो. त्याच्या साथीदारांसोबत आणि बचड्यांसह त्याचे रक्षण करतो. अतिशय खंबीर, धाडसी म्हणून त्याने स्वतःला प्रस्थापित केले आहे.