लोकसत्ता टीम

नागपूर : अमरावती महापालिकेच्या अंतर्गत एका बांधकामाला स्थगिती आणण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र हे आदेश भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या तथाकथित लेटरहेडवर हस्तलिखित स्वरुपात आदेश दिले होते. अशाप्रकारे राजकीय पक्षाच्या लेटरहेडवर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने ही बाब बेकायदेशीर असल्याचे सांगत संबंधित आदेश रद्द करण्याच्या सूचना केल्या. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्या.एम.एस.जवळकर यांनी हा निर्णय दिला.

major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Supreme Court grants bail to YouTube vlogger arrested on charges of insulting Tamil Nadu Chief Minister MK Stalin
निवडणुकीआधी किती जणांना तुरुंगात टाकणार? सर्वोच्च न्यायालयाकडून ‘यूटय़ूब व्लॉगर’ला जामीन देताना विचारणा
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

अमरावती येथील ७७ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी यांचे बांधकाम सुरू होते. या बांधकामावर स्थगिती आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणणाऱ्या एका महिलेने लेटरहेडवर मुख्यमंत्र्यांनी हाताने स्थगितीसाठी लिहिलेला एक संदेश आणला. ७ नोव्हेंबर २०२३ च्या तारखेचा हा आदेश होता. या लेटरहेडच्या आधारावर अमरावती महापालिकेच्या शहरी विकास विभागाच्या सहायक संचालकांनी बांधकामावर स्थगितीसाठी आदेश जारी केला. यानंतर या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले.

आणखी वाचा-“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारचा आदेश देण्याचे अधिकार नसल्याचा दावा याचिकाकर्त्याने न्यायालयात केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने संबंधित आदेश रद्द करण्यासाठी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी कोणतेही अधिकार नसताना राजकीय पक्षाच्या लेटरहेटवर असे आदेश देणे कायद्याला धरून नाही, असे मत उच्च न्यायालयाने निर्णय देताना व्यक्त केले. मात्र मुख्यमंत्री या याचिकेत प्रतिवादी नसल्याने त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड.ए.एस.मार्डीकर यांनी तर राज्य शासनाच्यावतीने ॲड.ए.एम.कडुकर यांनी बाजू मांडली. अमरावती महापालिकेच्यावतीने ॲड.आर.एस.परसोडकर यांनी युक्तिवाद केला.