गडचिरोली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. पण त्यांना कारागृहात जाऊन आलेल्या संजय राऊत यांचा सहवास अधिक आवडतो. आमच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसला नसता तर ते आज अमेरिकेचे प्रमुख जो बायडन यांच्या बाजूला बसले असते, अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

हेही वाचा – पिचकारीबहाद्दरांकडून पाच महिन्‍यांत ७.८१ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

हेही वाचा – चोरीच्या मुरूमाचा जप्त ट्रॅक्टर तलाठी कार्यालयातून पळवला, अट्टल चोरट्यांचा प्रताप

जनसंपर्क अभियानासाठी गडचिरोली येथे आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या की, प्रत्येकवेळी आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. शरीरावर व्यंग केले जात आहे. आमचे नेते संयमी आणि सुसंस्कृत असल्याने ते त्या पातळीवर जाऊन प्रत्युत्तर देत नाहीत. पण आमचा बांध तुटतो आहे. वारंवार उद्धव ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव हे तीन जोकर आमच्या नेत्यांवर त्यांच्या शरीरावर व्यंग करीत आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर ज्याप्रकारची टीका केली गेली, तो समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. सरकारच्या धोरणावर किंवा एखाद्या निर्णयावर टीका करणे ठीक, पण नेत्यांवर अशापद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन काहीही बोलणे हे आम्ही आता खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.