महविकास आघाडी सरकारच्या काळात उठवण्यात आलेली दारूबंदी पुन्हा लागू करावी. दारूबंदी केवळ कागदावर नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केली. वाघ यांच्या मागणीने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय धुराळा उडण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा- यवतमाळ: चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या वाघ आज चंद्रपुरात आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष अंजली घोटेकर, सुभाष कासुगोट्टूवार, संजय गजपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषेत वाघ यांनी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव जिहाद कायदा लागू करावा, अशीही मागणी केली. संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढवायची आहे. महिलांचे सर्व प्रश्न महिला मोर्चाच्या माध्यमातून सोडवण्यास प्राधान्य असल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. केवळ महिला आहे म्हणून उमेदवारी मिळणार नाही तर त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असावी. केवळ महिला आहे म्हणून उमेदवारी द्या, हे योग्य नाही. इतर पक्ष व भाजपमध्ये खूप फरक आहे. भाजपमध्ये दबावतंत्र चालत नाही. काम करतात त्यांना संधी मिळते. कुणाला कुठे संधी द्यायची, हे वरिष्ठ नेते जाणतात, असे वाघ यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- बुलढाणा: उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेला पोलिसांची सशर्त परवानगी

मंत्री संजय राठोड प्रकरणी बोलताना, न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांचा सन्मान ठेवलाच पाहिजे. महिलांनी काही बोलायचेच नाही, अशा पद्धतीने घेरले जाते. काही महिलांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान, ही पद्धत महाराष्ट्रात रुजू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.