यवतमाळ : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने शहरात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो नागरिक उघड्यावर आले. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबून राहू नये यासाठी मान्सूनपूर्व स्वच्छतेची गरज असते. मात्र नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी मान्सूनपूर्व स्वच्छतेची कुठलीही कामे केलेली नाही. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले व वित्तहानी झाली. तसेच दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप यावेळी नागरिकांनी केला.

या पार्श्वभूमीवर शहरातील शेकडो नागरिकांनी आज सोमवारी मुख्याधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व्हावे या मागणीसाठी नगर पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. जन सुनावणीत आपली प्रखर मते मांडून मुख्याधिकारी आणि नगर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. कंत्राटदारांची पाठराखण करून नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवले.

हेही वाचा – अमरावती : संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक

हेही वाचा – महापुरुषांचा अपमान करणारे संभाजी भिडे गजानन महाराजचरणी नतमस्तक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांच्या संतप्त भावना समजून घेण्यासाठी यवतमाळ तहसीलदार शयोगेश देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि भावना शासनापर्यंत पोहोचवतो असे आश्वासनही दिले तसेच बेबी घोडमारे यांचा न.प. प्रशासनाच्या संवेदनाहिन वर्तनाने झालेल्या मृत्यूबद्दल शासन चर लक्ष रुपयांचे अर्थ साह्य करणार असल्याचे शासनाच्या वतीने जाहीर केले. प्रसंगी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील पूरस्थितीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.