scorecardresearch

“संकटात आम्ही संजय राठोड यांच्यासोबत होतो”, मुख्यमंत्री शिंदेंचे विधान; म्हणाले, “पूजा चव्हाण प्रकरणात…”

आनंदात सर्व सोबत येतात, संकटात कोणी नसतो. मात्र, अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

cm Eknath Shinde Pohradevi
"संकटात आम्ही संजय राठोड यांच्यासोबत होतो", मुख्यमंत्री शिंदेंचे विधान (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वाशीम : संजय राठोड यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी उभा राहिला. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची पाठराखण केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे पोहरादेवी येथे सांगितले.

हेही वाचा – “कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून घेतलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी”; शरद पवार यांचे मत

हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; चर्चा मात्र उच्च न्यायालयाने दोनदा बजावलेल्या नोटीसची

आनंदात सर्व सोबत येतात, संकटात कोणी नसतो. मात्र, अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत, अशी पुष्टी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जोडली. संजय राठोड संकटात असताना त्यांच्याशी आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांशी आमचे काय देणे-घेणे, असा विचार आम्ही केला नाही. तो आमचा आहे. आम्ही आपले आहोत. आपल्यात जिव्हाळा आहे, म्हणूनच आज पोहरादेवी येथे जनसागर उसळला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 16:38 IST
ताज्या बातम्या