scorecardresearch

चंद्रपूर: कोल माफियांची गुंडागर्दी, बंदूक डोक्याला लावून तीन ट्रक कोळसा चोरला

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीच्या एंट्री गेट वर दोन सुरक्षा रक्षकांच्या डोक्याला बंदूक लावुन कोल माफियांनी तीन ट्रक आत कोल स्टॉक वर नेले आणि तेथून कोळसा भरून त्याच पद्धतीने बाहेर घेऊन गेले.

coal
photo source फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम प्रातिनिधिक फोटो

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीच्या एंट्री गेट वर दोन सुरक्षा रक्षकांच्या डोक्याला बंदूक लावुन कोल माफियांनी तीन ट्रक आत कोल स्टॉक वर नेले आणि तेथून कोळसा भरून त्याच पद्धतीने बाहेर घेऊन गेले. यामुळे वेकोलिच्या सुरक्षेचे पूर्ण वाभाडे निघाले असून लाखो रुपयांचा कोळसा अवैध्य मार्गाने चोरी जात असून वेकोलि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>>मेडिकल, मेयो, सुपरच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, रुग्णांचा जीव टांगणीला; परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचारीही संपावर

रविवार २२ मार्च रोजी मध्यरात्री दिड ते दोन वाजताचे सुमारास ही घटना घडली. दोन सुरक्षा गार्ड ट्रकच्या एंट्री गेटवर कार्यरत असताना अचानक दोन इसमांनी या दोन्ही सुरक्षा रक्षकांवर देशी कट्टा सदृश्य बंदूक ताणली. यामुळे घाबरलेले हे सुरक्षा रक्षक काहीच करू शकले नाहीत. यानंतर ट्रक क्रमांक एमएच ३४ बीजी ९५९५, ट्रक क्रमांक एमएच ३४ बीझेड ०४३० आणि एमएच ३४ बीजी ६५०० हे कोल स्टॉक वर गेले. तेथे कोळसा लोडिंग मशीन द्वारे तिन्ही ट्रक भरून एकाच वेळी गेट बाहेर काढण्यात आले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने वेकोलि सुरक्षा अधिकारी आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिस ४.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. यानंतर सकाळी घटनेची तक्रार राजुरा पोलिसांकडे नोंदविण्यात आली.

हेही वाचा >>>गडचिरोली : व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत शिक्षण मंचातील वाद चव्हाट्यावर; संख्याबळ असूनही अध्यक्ष, सचिवांचा पराभव

राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना माहिती मिळताच या सभोवती सर्व मार्गाची नाकाबंदी करून ट्रक पकडणे शक्य झाले असते, मात्र अशा प्रकारची प्रयत्न झाला नसल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 13:53 IST