लोकसत्ता टीम

नागपूर: चीन, तायवान, हाँगकॉन्ग, सिंगापूर या देशांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत भारतात हे प्रमाण कमी असले तरी वाढत आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आणि सेंटर फॉर साईटचे प्रमुख पद्मश्री डॉ. महिपाल सचदेव यांनी दिली.

नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. सचदेव म्हणाले, चीन, तायवान, हाँगकॉन्ग, सिंगापूरमध्ये सुमारे ६० टक्के मुलांमध्ये दृष्टिदोष म्हणजे जवळचा चष्मा लागण्याची समस्या आढळते. भारतात मात्र तुलनेत कमी म्हणजे केवळ २० ते २५ टक्के मुलांमध्ये ही समस्या आढळते. परंतु देशातील एकूण मुलांपैकी निम्मे मुले चष्मा लावताना दिसत नाही.

आणखी वाचा-निरीक्षण मनोरे, ड्रोन व सीसीटीव्ही आणि कडक बंदोबस्त; गणेश विसर्जनावर पोलिसांची करडी नजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात चष्मा लागण्याचे कारण हे भ्रमणध्वनी, लॅपटॉपसह मुलांचे ‘स्क्रिन टाईम वाढणे आहे. मुलांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी भ्रमणध्वनी, लॅपटॉपपासून दूर ठेवणे, घरातच एका विशिष्ट अंतरावर वाचण्याचे चार्ट लावून मुलांची दृष्टी ‘चेक’ करण्यासह त्याला हिरव्या भाज्या व पोषक अन्न खाली घालणे गरजेचे असल्याचेही डॉ. सचदेव म्हणाले.