लोकसत्ता टीम

बुलढाणा: किमान दोन टप्प्यात पार पडणाऱ्या यंदाच्या गणेश विसर्जनावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी कडक पोलीस बंदोबस्ताला ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे सीसीटीव्ही, निरीक्षण मनोरे( वॉच टॉवर) याची जोड देण्यात आली आहे. ९२ संवेदनशील स्थळी ‘खाकी’ची विशेष नजर राहणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास दंगा काबू पथक व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

यंदा रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जनासाठी परवानगी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अशोक थोरात व सहा उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा विशेष शाखेचे नरेंद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली. २६ पोलीस निरीक्षक, ४५ सहायक पोलीस निरीक्षक, ५८ पोलीस उप निरीक्षक, कमीअधिक २ हजार पोलीस कर्मचारी बंदीबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलासह परजिल्ह्यातून दोनशे पोलीस पाचारण करण्यात आले आहे. याला एक शीघ्र कृती दल व चार दंगा काबू पथकाची जोड आहे

आणखी वाचा-भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार

शंभर विसर्जन घाट

दरम्यान जिल्ह्यातील १ हजार ४५ मंडळासाठी सुमारे १०० ठिकाणी विसर्जन घाट आहे. गाव तलाव ,नदी या ठिकाणी हे घाट आहेत. बुलढाण्यात तीन ठिकाणी विसर्जन व्यवस्था आहे. घरगुती गणपती साठी संगम तलाव तर सार्वजनिक मंडळासाठी पैनगंगा नदीवरील सागवान व साखळी पुल येथे हे विसर्जन स्थळ आहे.

Story img Loader