वर्धा: क्रिप्टोकरन्सी या आभासी चलनातून वेतन देण्याचे आमिष दाखवून एका संगणक अभियंता विवाहित महिलेस लाखोंनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.स्वतः संगणक अभियंता तरीही सायबर गुन्ह्यात फसलेली ही विवाहित महिला धन्वंतरी नगरात राहते. श्रीमती कोमल या महिलेचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अप्लेअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संपर्क झाला. नौकरीची गरज असल्याने त्यांनी कंपनीने दिलेल्या व्हाट्सॲप क्रमांकावर स्वतःची माहिती देत नोंदणी केली. कंपनीची संपर्क अधिकारी सीता बिस्ट हिच्याशी संपर्क साधण्यास तिला सांगण्यात आले.

हेही वाचा >>>क्रुरतेची परिसीमा; नागपूरमध्ये वाहनचालकाने श्वानाला गाडीखाली चिरडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिस्ट हिने टेलिग्राफ ॲप नावाची लिंक कोमल यांना पाठविली. ऑनलाईन नौकरी असल्याने या लिंकशी संपर्क केल्यानंतर कोमल व्हीआयपी समूहात समाविष्ट झाल्या. वेगवेगळे ‘टास्क’ देत ते पैसे भरल्यानंतरच उपलब्ध होत असल्याची सूचना झाल्याने कोमल तसतसे पैसे भरत गेल्या. इथूनच त्यांना गंडविणे सुरू झाले. त्यांचे क्रिप्टो करन्सीचे खाते उघडण्यात आले. शंभर पॉईंट झाल्यावर पैसे परत मिळण्याची हमी मिळाल्याने कोमल पैसे भरत गेल्या. ही रक्कम चार लाख रुपयांवर पोहचली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोमल यांनी सेवाग्राम पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.