वाशिम : आज वाशिम शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य व यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले असता त्यांच्या खुर्चीवर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी बसले. मात्र, राजू पाटील राजे भाषण आटोपून आले असता ज्ञायक पाटणी यांनी खुर्ची न दिल्याने काही काळ एकच गोंधळ उडाला होता.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्याने आज वाशिम शहरातील पाटणी कॉम्पलेक्स येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या समर्थनार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी समोरील रांगेत बसले होते. यावेळी नेत्यांनी आपापले विचार व्यक्त केले. त्यानंतर भाजपचे प्रदेश सदस्य तथा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले. त्यावेळी ज्ञायक पाटणी त्यांच्या खुर्चीवर बसले होते.

Wardha, Narendra Modi,
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘या’ नेत्याने थोपाटले दंड; वाराणसीत लोकसभेसाठी अर्ज दाखल
Rahul Gandhi to hold rally for Congress candidate in Pune
पुणे : ‘नरेंद्र मोदींकडून राजकारणाची चेष्टा’, रवण्णा प्रकरणावरून राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका
Jayant Patil, public money, GST,
जनतेच्या पैशांची जीएसटीच्या माध्यमातून लूट, जयंत पाटील यांचा आरोप
Narendra modi and amit thackeray
VIDEO : मोदी आणि अमित ठाकरेंच्या भेटीसाठी फडणवीसांचा पुढाकार; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
PM Narendra Modi in Kolhapur
‘दोन टप्प्यानंतर एनडीए २-० ने पुढे’, कोल्हापूरच्या सभेत फूटबॉलच्या भाषेत पंतप्रधान मोदींची जोरदार फटकेबाजी
Chandrakant Patil, shivsena candidate,
मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट
Ranajagjitsinha Patil sharad pawar
“आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला
shiv sena workers stopped narayan rane campaigning
रत्नागिरीत प्रचारपत्रकावरून भाजप-सेनेचे नाराजीनाटय

हेही वाचा – ‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत

राजू पाटील राजे भाषण आटोपून खुर्चीवर बसण्यासाठी गेले असता ज्ञायक पाटणी यांनी खुर्चीवरून उठवण्यास नकार दिल्याने काही काळ गोंधळ उडाला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, अर्जुन खोतकर, राजश्री पाटील महाले यांची उपस्थिती होती. अखेर उपस्थित नेत्यांनी मध्यस्ती करून राजू पाटील राजे यांना दुसरीकडे बसविले तर ज्ञायक पाटणी मात्र त्याच खुर्चीवर बसून होते. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

हेही वाचा – भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, माजी खासदार कुमार केतकर यांचे परखड मत

पालकमंत्र्यांच्या भाषणादरम्यान लोक उठले…

आज वाशिम शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजश्री पाटील यांचे भाषण लोकांनी ऐकले मात्र त्यानंतर भाषणासाठी पालकमंत्री संजय राठोड उभे राहिल्यानंतर लोक उठून बाहेर निघू लागले. पालकमंत्री संजय राठोड हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याकडे चांगलेच दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांचे मत आहे.