गडकरींच्या घरापुढे जोरदार नारेबाजी;  काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचे प्रत्युत्तर

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानाजवळ काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते गुरुवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास समोरासमोर आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणा देऊन आंदोलनात रंग भरण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनी पुढे सरकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना मागे ढकलत नियंत्रित केले.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला

महाराष्ट्र काँग्रेसने देशभर करोना पसवला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानसमोर निदर्शने केली.  त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजप कार्यकर्ते देखील गडकरी यांच्या घराजवळ गोळा झाले. काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने  तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी दोन्ही पक्षांना नेमून दिलेल्या जागेवरुन  हलण्याची संधी दिली नाही.  सुमारे २५ ते ३० मिनिटांनी पोलिसांनी सर्वप्रथम काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, महिला शहराध्यक्ष नॅश अली, प्रशांत धवड, रमेश पुणेकर, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, अतुल कोटेचा, अ‍ॅड. रेखा बाराहाते, अवंतिका लेकुरवाळे, अ‍ॅड. नंदा पराते, अ‍ॅड. कांता पराते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांना जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकांच्या जवळ रस्त्याच्या कडेला आंदोलनासाठी जागा देण्यात आली. त्यांनी गडकरी यांच्या घराच्या दिशेने जाऊ नये म्हणून कठडे लावण्यात आले.  गडकरी यांच्या निवासस्थानाखालील रस्त्याच्या कडेला भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी जागा देण्यात आली होती. त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडे जाता येऊ नये म्हणून कठडे लावण्यात आले होते. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर वर्धा रोड ते नरेंद्रनगरला जोडणारा उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

मोदींविरोधात महिला आक्रमक

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. मोदी यांना घाबरत नाही. तानाशाही नही चलेगी, अशा घोषणात देण्यात आल्या. विकास ठाकरे यांना पोलिसांनी वाहनात बसण्याची विनंती करून त्यांना ताब्यात घेतले. परंतु महिला कार्यकर्त्यां घोषणा देत आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी वाहनात बसण्यास नकार दिला. हे सर्व पाच-सहा मिनिटे चालले. त्यानंतर ठाकरे यांच्याकडून संदेश आला आणि महिला पोलीस वाहनात बसल्या.

पटोलेंविरोधात घोषणा

भाजपच्या महिला कार्यकर्त्यां मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात घोषणा दिल्या.  आंदोलनात युवा कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवानाते, संजय बंगाले, अविनाश ठाकरे, परेंद्र पटले, संदीप गवई उपस्थित होते.