राजेश्वर ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना फोडून भाजपात आणल्यानंतर याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भाजपमधील असंतुष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी भाजपच्या यादीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांची शेवटची यादी येणार आहे.
ज्यांना भाजपकडून डावलण्यात येईल अशा सक्षम उमेदवारांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही जागांवर चर्चा सुरू आहे. विदर्भातील काही नावांवरही अद्याप एकमत झालेले नाही. उमेदवारीचा घोळ कमी-अधिक प्रमाणात सुरूच असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजपने त्यांच्या काही उमेदवारांची नावे निश्चित केली आहे. त्यामुळे सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाजपचे काही चांगले नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या यादीकडे लक्ष आहे. ते जाहीर होताच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे अंतिम होतील.
– विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते.