नागपूर : लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. त्यामध्ये एससी, एसटी महिलांना आरक्षण आहे, परंतु ओबीसी महिलांना आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे ओबीसी नेते नाराज आहेत. भाजपाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी ओबीसी महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर विरोधी पक्ष नेते काय म्हणाले, जाणून घेऊ या.
याआधी भाजपा नेत्या उमा भारती यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आणि लोकसभेत विधेयक मांडले जात असताना त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला. तो तात्विक विरोध होता. त्याचा ओबीसी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळावे या आजच्या त्यांच्या मागणीला आमचाही पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते येथे आज एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
हेही वाचा – कायदा केल्यानंरतही महिलांना आरक्षणाचा लगेच लाभ नाही! कारण काय? जाणून घ्या…
हेही वाचा – चंद्रपूर : तब्बल १ कोटी ११ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, ‘या’ तंबाखू तस्कराचे नाव चर्चेत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देताना त्यात ओबीसी महिलांनादेखील आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेसची पहिल्यापासून भूमिका आहे.