नागपूर : महाराष्ट्रात एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. आमचे सरकार आल्यानंतर ही पदभरती रद्द करण्यात येईल आणि शासकीय भरती करण्यात येईल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते आज नागपूर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कृषी, महसूल, पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने होत आहे. राज्याची सुरक्षा खासगी लोकांच्या हाती देण्यात येत आहे. कंत्राटी पद्धतीने पाच वर्षे नोकरी केल्यानंतर पुढील आयुष्य युवकांनी जगायचे कसे? या सरकारविरोधात युवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : प्रसादासाठी स्टीलची प्लेट आणा व मिळवा रोख पुरस्कार
भाजपने ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांना मंत्रिमंडळात घेतले. चोरांना मंत्रिमंडळात घेऊन सरकार गप्पू सेना झाली आहे. नागपुरात एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. त्या आरोपीला शोधता येत नाही. यावर सरकारचे तोंड शिवले आहे. देशमुख केव्हापासून ओबीसी झाले. देशमुख ओबीसी असतील तर आनंद आहे. वारंवार पक्ष बदलणारी व्यक्ती लक्ष वेधून घेण्यासाठी यात्रा काढते आहे. त्यांना काही काम नाही, असेही ते म्हणाले.